india vs West Indies :भारताचा विंडीजवर सलग तिसरा विजय, मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश AVP Majha
टीम इंडियानं अहमदाबादच्या तिसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत ३-० असं निर्भेळ यश संपादन केलं. या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला विजयासाठी २६६ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर विंडीजचा अख्खा डाव १६९ धावांत आटोपला. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी तीन, तर दीपक चहर आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या ११० धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत सर्व बाद २६५ धावांची मजल मारली. श्रेयसनं नऊ चौकारांसह ८०, तर रिषभनं सहा चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी उभारली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं ३३ आणि दीपक चहरनं ३८ धावांची खेळी करून भारताच्या डावाला आणखी मजबुती दिली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली.