India vs South Africa, 3rd Test : टीम इंडिया अडचणीत, तिसऱ्या दिवशी खराब सुरुवात ABP Majha

केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात अत्यंत खराब झालीय. कालच्या २ बाद ५७ या धावसंख्येवरुन खेळताना टीम इंडियानं दोन फलंदाज स्वस्तात गमावले. अवघ्या एका धावेच्या मोबदल्यात पुजारा आणि अजिंक्य रहाणे माघारी परतले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावात गुंडाळून भारतानं १३ धावांची नाममात्र आघाडी घेतली होती. पण भारताच्या दुसऱ्या डावात काल मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल ही सलामीची जोडी माघारी परतली होती. त्यानंतर आजच्या पहिल्याच सत्रात पुजारा आणि रहाणे बाद झाल्यानं टीम इंडिया काहीशी संकटात सापडली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola