Actor Siddharth apologises to Saina Nehwal :अभिनेता सिद्धार्थची सायना नेहवालला पत्र लिहून जाहीर माफी
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटवरून अभिनेता सिद्धार्थ यानं पत्र लिहून जाहीर माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेनंतर सायनानं ट्वीट करत चिंता व्यक्त केली होती. या ट्वीटला प्रत्युत्तर देताना सिद्धार्थनं वापरलेली भाषा आक्षेपार्ह होती. त्यावरून सिद्धार्थवर जोरदार टीका झाली. त्यानंतर सिद्धार्थनं पत्र लिहून सायनाची माफी मागितलेय. तुझे ट्विट वाचताना नाराजी आणि माझ्या मनात राग जरी असला तरी त्यामुळे मी वापरलेल्या शब्दाचे समर्थन करू शकत नाही. असं सिद्धार्थनं या पत्रात म्हटलंय