India Vs Pakistan T20 WC : चाहत्यांनो आपल्या भावनांना आवर घाला...टीका थांबवा,टीम इंडियाला सपोर्ट करा

Continues below advertisement

आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाच्या पाकिस्तानवरच्या सलग बारा विजयांची मालिका अखेर दुबईत खंडित झाली. युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं ३१ धावांत तीन विकेट्स काढून पाकिस्तानच्या विजयाचा पाया घातला. त्याच्या या कामगिरीमुळंच भारताला वीस षटकांत सात बाद १५१ धावांचीच मजल मारता आली होती. मग बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननं १५२ धावांची अभेद्य सलामी रचून त्या पायावर विजयाचा कळस चढवला. बाबर आझमनं नाबाद ६८ धावांची आणि मोहम्मद रिझवाननं नाबाद ७९ धावांची खेळी उभारली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram