IND Vs AUS | विराटच्या अनुपस्थितीत रहाणेचं कुशल नेतृत्त्व, मेलबर्नहून गौरव जौशीचा खास रिपोर्ट
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. बुमराहला रविचंद्रन अश्विन आणि पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजनं चांगली साथ दिली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मयांक अगरवालच्या रुपात धक्का बसला. मयांक शून्यावर बाद झाला. मात्र नंतर शुभमन गिल आणि पुजाराने सावधपणे खेळत पडझड होऊन दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शुभमन गिल 28 तर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. शुभमन गिलने 5 चौकारांसह 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कनं एक विकेट घेतली.