India Vs England : भारत-इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द, टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

Continues below advertisement

भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधला मॅन्चेस्टरचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं परस्पर सामंजस्यानं घेतला आहे. तसंच रद्द झालेला पाचवा कसोटी सामना कधी खेळवता येईल, याविषयी दोन्ही बोर्ड चर्चा करून निर्णय घेतील असं बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram