IND VS PAK : रोहितऐवजी इशानला संधी द्यायला हवी होती? पत्रकाराच्या प्रश्नानंतर विराटनं मारला डोक्यावर हात
T20 World Cup 2021: विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाला समोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारताचा दहा विकेट्सनं पराभव करत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानकडून एकदाही पराभवूत झालेला नव्हता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. विराट-पंत वगळता इतर फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे नांगी टाकली. भारतीय संघानं दिलेलं 152 धावांचं आवाहन पाकिस्तान संघाने एकही विकेट्स न गमावता पार केलं. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं पराभव स्वीकारात स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकाराची बोलती बंद केली. इशान किशनचा सध्याचा फॉर्म पाहाता पुढील सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर बसवणार का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला होता.
Tags :
Ind Vs Pak T20 World Cup 2021 IND Vs PAK Live IND Vs PAK T20 Live India Vs Pakistan Score Live