IND Vs ENG : टीम इंडियाचा स्वयंघोषित सदस्य 'जार्वो', लाॅर्ड्स पाठोपाठ हेडिंग्लेवर जार्वोची घुसखोरी
लॉर्डसपाठोपाठ लीड्स कसोटीतही थेट मैदानात घुसणारं गमत्या व्यक्तिमत्त्व म्हणजे हा जार्वो सिक्स्टी नाईन. मूळचा हा इंग्लिश क्रिकेटरसिक चक्क टीम इंडियाची जर्सी घालूनच थेट मैदानात घुसतो. त्यामुळं दूर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांना त्याला ओळखणं आधी कठीण जातं. पण एकदा का ढेरपोट्या जार्वोची देहबोली लक्षात आली की, सुरक्षारक्षकांनाही त्याला आवरण्यासाठी मैदानात धाव घ्यावी लागते. लॉर्डसवर तो भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण सुरु असताना मैदानात उतरला होता.
Tags :
Ind Vs Eng Cricket Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sports ABP Majha ABP Majha Video Headingley Jarvo