IND VS ENG : भारताची सराव सामन्यात England वर मात, भारतानं सहा चेंडू राखून पार केलं लक्ष्य
Continues below advertisement
विराट कोहलीच्या टीम इंडियानं पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनं पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 189 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण भारतीय फलंदाजांनी सहा चेंडू आणि सात विकेट्स राखून ते आव्हान गाठलं. सलामीच्या लोकेश राहुलची 51, तर ईशान किशनची 70 धावांची खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. रिषभ पंतनं 12 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 29 धावांची मोलाची खेळी उभारली. त्याआधी, मोहम्मद शमीनं 40 धावांत तीन विकेट्स काढण्याची कामगिरी बजावली.
Continues below advertisement