IND vs ENG 4th Test Match : ओव्हल कसोटी रंगतदार अवस्थेत; अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांची 'कसोटी'

IND vs ENG 4th Test Match, Day4: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 466 धावा केल्या. टीम इंडियाने 367 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंड समोर आता विजयासाठी 368 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. शार्दुल ठाकूरने 60 धावा तर ऋषभ पंतने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली आहे. चौथ्या दिवस अखेर इंग्लंडने नाबाद 77 धावा केल्या आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola