IND vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये स्मृती मानधनाची शतकी खेळी
विजय साळवी, एबीपी माझा
Updated at:
01 Oct 2021 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिली पिंक बॉल टेस्ट सुरु आहे. त्यातल्या पहिल्या डावातच सांगलीच्या स्मृती मानधनानं झुंजार फलंदाजी करत तडाखेबाज शतक झळकावलंय. पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. स्मृतीनं 170 चेंडूत कसोटी कारकीर्दीतील पहिलं आणि गुलाबी चेंडूच्या कसोटीतही पहिलं शतक झळकावलंय. स्मृतीच्या आजच्या झंझावात खेळामुळे तिच्यावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा वर्षाव होतोय. शिवाय स्मृतीनं विराट कोहलीशी बरोबरी केल्याचंही बोललं जातंय. कारण विराटनंही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावलं होतं.