ICC T20 World Cup 2021 : Martin Guptill ची भारताविरुध्दच्या सामन्यातून माघार? : ABP Majha
Continues below advertisement
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या दुसऱ्या गटात भारत आणि न्यूझीलंड संघांमधला महत्त्वाचा सामना हा रविवारी खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडच्या दृष्टीनं चिंतेची बाब म्हणजे सलामीच्या मार्टिन गप्टिलला या सामन्यातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या हॅरिस रौफचा चेंडू आदळून गप्टिलच्या तळपायाला दुखापत झाली होती. गप्टिलची ती दुखापत मंगळवारच्या सामन्यानंतर आणखी बळावली. त्यामुळं त्याला किमान २४ ते ४८ तास विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतरच गप्टिलच्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. मार्टिन गप्टिल हा न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी शिलेदार आहे. त्यानं १०३ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये २९५६ धावांचा रतीब घातला आहे.
Continues below advertisement