Glenn Maxwell:ग्लेन मॅक्सवेलनं होता म्हणून ऑस्ट्रेलिया जिंकली,तीन विकेट्सनी रोमांचक विजय : ABP Majha

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या आयुष्यातल्या सर्वोत्तम खेळीचा नजराणा वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या मोजक्या क्रिकेटरसिकांना पेश केला. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि त्यातही केवळ एका पायावर साऱ्या शरीराचं वजन पेलून १२८ चेंडूंत नाबाद २०१ धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीला २१ चौकार आणि १० षटकारांचा साज होता. त्याच्या याच खेळीनं ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात तीन विकेट्सनी रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची १९व्या षटकात सात बाद ९१ अशी दाणादाण उडाली होती. त्या परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी १७० चेंडूंत २०२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात कमिन्सचा वाटा ६८ चेंडूंत नाबाद १२ धावांचा होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola