Afghanistan vs Australia : अफगाणिस्ताननं विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान

अफगाणिस्ताननं विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९२ धावांचं आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे सलामीचा इब्राहिम झादरान हा विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. इब्राहिम झादराननं १४३ चेंडूंत नाबाद १२९ धावांची खेळी उभारली. याआधी समिउल्ला शिनवारीनं २०१५ सालच्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध केलेली ९६ धावांची खेळी हा अफगाणिस्तानचा आजवरचा वैयक्तिक उच्चांक होता. तो विक्रम झादराननं मोडीत काढला. त्यानं एक खिंड नेटानं लढवून अफगाणिस्तानच्या प्रत्येक फलंदाजासोबत छोटी-मोठी भागीदारी रचली. त्यामुळंच अफगाणिस्तानला ५० षटकांत पाच बाद २९१ धावांची मजल मारता आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola