Chetan Sharmaच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त,T 20 उपांत्य फेरीत भारताच्या पराभवानंतर BCCI निर्णय
BCCI : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले होते. इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर बीसीसीयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पाचही जागांसाठी अर्ज मागवले आहेत. चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांना बरखास्त करण्यात आले आहे. दरम्यान, निवड समितीच्या नवीन जागा भरेपर्यंत चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच काम पाहणार आहे.