BCCI कडून अर्थसहाय्याची घोषणा, कोरोनामुळे गेल्या वर्षीचा रणजी मोसम रद्द, खेळाडूंना सामन्याचं निम्मं मानधन
Continues below advertisement
Domestic Cricketers Fee Hike: देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी ट्विट करत सांगितले की, बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्या ट्वीटनुसार 40 पेक्षा अधिक मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना आता 60,000 रुपये मिळणार आहे. तर 23 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 पेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेटपटूंना 20,000 रुपये मिळणार आहे.
Continues below advertisement