Australia vs New Zealand Match : ट्रॅव्हिस हेडचं विश्वचषक पदार्पणात धडाकेबाज शतक साजरं

ट्रॅव्हिस हेडनं विश्वचषकातल्या पदार्पणात झळकावलेलं शतक आणि त्यानं डेव्हिड वॉर्नरसोबत दिलेली १७५ धावांची सलामी ऑस्ट्रेलियाच्या डावाला धावांची मजबुती देणारी ठरलीय. धर्मशालातल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला विजयासाठी ३८९ धावांचं आव्हान दिलंय. खरं तर या सामन्यात ऑस्ट्रेलियानं चोविसाव्या षटकांतच दोन विकेट्स गमावून दोनशे धावांचा पल्ला ओलांडला होता. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ४९ षटकं आणि दोन चेंडूंत ३८८ धावांत रोखलं. ट्रॅव्हिस हेडनं ६७ चेंडूंत १० चौकार आणि सात षटकारांसह १०९ धावांची खेळी उभारली. डेव्हिड वॉर्नरनं ६५ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांसह ८१ धावांची खेळी रचली. मग मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस आणि पॅट कमिन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आणखी मजबुती दिली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी तीन, तर मिचेल सॅन्टनरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola