Austrailia कसोटी संघाला नवा कर्णधार मिळणार? अश्लील मेसेजमुळे टीम पेन कर्णधारपदावरून पायउतार
Continues below advertisement
तब्बल 65 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व एका गोलंदाजाकडे जाण्याची शक्यता आहे. कारण, महिला सहकाऱ्याला अश्लिल मेसेज आणि फोटोज पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला. त्यामुळे आगामी अॅशेस मालिकेसाठी कर्णधारपद कुणाकडे जाणार याची चर्चा होती. त्यात गोलंदाज पॅट कमिन्सचं नाव सर्वात पुढे आहे. असं झालं तर 65 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाकडे कर्णधारपद जाईल. 28 वर्षांच्या कमिन्सने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 164 विकेट्स घेतलेत. त्यामुळे त्याची वर्णी लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
Continues below advertisement