Lokesh Rahul : फलंदाज लोकेश राहुलच्या डाव्या मांडी दुखापत, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून माघार

Continues below advertisement

भारताचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलच्या डाव्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळं, त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेत खेळू न शकणारा राहुल आता बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीसाठी रवाना होईल. एनसीएत त्याच्या दुखापतीवर उपचार होतील. तसंच एनसीए राहून तो टीम इंडियाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारीही करेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram