Ravi Shastri | रवी शास्त्रीनंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा कोणाकडे जाणार?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
18 Sep 2021 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाला नवीन कोच मिळणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर समाप्त होणार आहे. पुढील दोन महिन्यानंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. सध्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अनिल कुंबळेच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनिल कुंबळेच्या नावाबरोबर वीवीएस लक्ष्मणचे देखील नाव समोर येत आहे.