BCCI ने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह इतर तीन प्रशिक्षक पदांसाठी मागवले इच्छुकांचे अर्ज
बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या पदांसाठीही इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची बीसीसीआयनं दिलेली ऑफर माजी कर्णधार राहुल द्रविडनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर केवळ २४ तासांत बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासह आणखी तीन पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवणं हा एक सूचक योगायोग मानला जात आहे.
Tags :
Team India Bcci Rahul Dravid Dravid India Bowling Coach India Bating Coach India Fielding Coach