Amol Kale Death : एमसीए अध्यक्ष अमोल काळेंचं निधन; सुनंदन लेलेंचा न्यूयॉर्कमधून रिपोर्ट
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आज निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये होते. भारत आणि पाकिस्तान संघांत नासाऊ कौंटीच्या मैदानावर काल खेळवण्यात आलेला सामनाही त्यांनी पाहिला. आणि आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी अमोल काळे यांच्या पाली हिल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी अमोल काळे यांच्या पाली हिल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानं त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये असलेल्या एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही धक्का बसणं स्वाभाविक आहे. पाहूयात सुनंदन लेले यांनी न्यूयॉर्कमधून पाठवलेला रिपोर्ट.
माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांनी आधी एमसीएच्या सीनियर निवड समितीचे अध्यक्ष आणि आता क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष या नात्यानं अमोल काळे यांच्यासोबत गेली काही वर्षे अतिशय जवळून काम केलं. त्या काळात राजू कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
अमोल काळे यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या कारकीर्दीविषयी जाणून घेऊयात ग्राफिक्समधून.