T 20 World Cup : भारतीय संघाचा सामना यजमान अमेरिकेसोबत, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या साखळीत रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज यजमान अमेरिकेशी होणार आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतीय संघ हा अनुभवी आणि ताकदीनं बलाढ्य आहे. पण न्यूयॉर्कच्या धोकादायक खेळपट्टीवर काय घडेल याचा नेम नाही. त्यामुळं भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ सलग तिसरा विजय मिळवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर एटचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी उत्सुक आहेत. त्या दोन्ही संघांनी पहिले दोन्ही सामने जिंकून चार गुणांची कमाई केली आहे.अमेरिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात क्रिकेटविश्वातील अनेक रथीमहारथी खेळतायत. पण त्या रथीमहारथींइतकाच बोलबाला अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा आहे. आणि कारणही तसंच आहे. या विश्वचषकात पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारण्याचा मोठा पराक्रम त्यानंच गाजवलाय. त्यामुळंच आज भारताविरुद्धच्या सामन्यात सौरभ नेत्रावळकरच्या कामगिरीकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष आहे.पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट न्यूयॉर्कमधून पाठवलेला रिपोर्ट.