Amol Kale Death : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन, न्यूयॉर्कमध्ये हार्टअटॅक

Continues below advertisement

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (MCA President Amol Kale) यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर गेले होते. त्यांनी भारत आणि पाकिस्तान संघांत रविवारी खेळवण्यात आलेला सामनाही पाहिल्याची माहिती आहे.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अमोल काळे टी-20 विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी रविवारी झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. अमोल काळे यांनी एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सूरज सामत यांच्यासह रविवारी स्टेडियममधून टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा थरारक विजय पाहिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram