स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : पाण्यासाठी भटकंती जीवावर, माकडाची मान लोट्यात अडकली
Continues below advertisement
पाण्यासाठी वन्यप्राणी वनवन भटकत आहेत आणि हीच भटकंती प्राण्यांच्या जीवावर उठत आहे. याचाच प्रत्यय आणणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये घडली. पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या एका माकडाची मान लोट्यामध्ये अडकली.
दिग्रस येथील शनी मंदिर परिसरातील ही घटना आहे. तहानेने व्याकूळ माकडाच्या पिलाची मान अचानक स्टीलच्या लोट्यात अडकली. माकडीनीने लोटा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यात यश आलं नाही.
अखेर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वनविभागाला पाचारण केलं. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर लोटा काढण्यात यश आलं आणि माकडाची सुखरुप सुटका करण्यात आली.
मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माकडाला जीवनदान देण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेचं कौतुक होत आहे.