स्पेशल रिपोर्ट : पुणे : भिकाऱ्यांची मोफत रुग्णसेवा करणारा अवलिया डॉक्टर
Continues below advertisement
पुणे : डॉ. अभिजीत सोनवणे... रोज सकाळी उठतात. पुण्यातील मंदिरं आणि मशिदीचा परिसर गाठतात आणि मग सुरु होते रुग्णसेवा..
गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे DOCTOR FOR BEGGARS हा उपक्रम त्यांनी सुरु ठेवला आहे. रोज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत डॉक्टर सोनवणे भीक मागणाऱ्यांची रुग्णसेवा करतात.
उपचार करुन त्यांना भीक मागणं सोडायला लावणं, हा डॉ. अभिजीत सोनवणे यांचा हेतू आहे. आतापर्यंत 42 जणांनी भीक मागणं सोडलं आहे.
'सबका साथ, सबका विकास' पासून ही लोकं कित्येक मैल दूर आहेत. त्यांचा विकास कधी होईल माहित नाही, पण त्यांचे अश्रू पुसण्याचं काम हा अवलिया करत आहे. कुठलंही सेवाकार्य सुरु करण्यामागे एक प्रेरणा असते, तशीच डॉक्टर सोनवणेंच्या बाबतीतही आहे.
'देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातूनसुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती' या कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळी डॉ. सोनवणेंना अगदी तंतोतंत लागू पडतात.