स्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या पोलिसाचा मुलगा पीएसआय झाला!

जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.

धुळा कोळेकर यांनी ९ मे २००२ रोजी वरिष्ठ पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक उपअधीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात धुळा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या घटनेवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तसेच 'जखमी पोलिस 302' हा मराठी चित्रपट देखील बनवला गेला.

धुळा यांचा मुलगा रणजीत कोळेकरने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलं आहे. रणजीतची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. आणखी अभ्यास करून क्लास वन अधिकारी बनायचं रणजीतचं स्वप्न आहे. त्यासाठी आणखी मेहनत करण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola