स्पेशल रिपोर्ट : नाशिक आणि कोकणात भुजबळ-राणेच किंगमेकर!
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालानं राजकारणात नव्या मित्रत्वाची आणि जुन्या शत्रुत्वाला धार येणार असं दिसत आहे. कारण नाशकात पुन्हा एकदा भुजबळ फॅक्टर जिवंत झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची हातची जागा गेली आहे. तर कोकणात राणेंच्या मदतीने तटकरेंनी शिवसेनेला एकटं पाडलं आहे. त्यामुळे हा संघर्ष लोकसभा आणि विधानसभेतही कडवा होण्याची चिन्हं आहेत.