स्पेशल रिपोर्ट : नागपूर : धमकीची नको, बलात्कार झाल्यावर तक्रार दे, पोलिसांचा तरुणीला सल्ला

Continues below advertisement

केवळ बलात्काराची धमकी दिल्यानंतर नाही तर गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं.

नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे. याविरोधात ती पोलिसात गेली. त्यावेळी तिला पोलिसांनी हे धक्कादायक उत्तर दिलं.

सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले. मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलं आहे.

सध्या जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक केली जातेय.

हे गुंड मनात येईल तेव्हा जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर हल्ला करतात, बलात्काराची धमकी देतात. नागपूर पोलीस मात्र गुन्हा घडण्याची वाट पाहात मौन धारण करुन आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram