स्पेशल रिपोर्ट बंगळुरु: कट्टर विरोधक एकत्र, कर्नाटकात 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला मोदीविरोधक एकवटलेले पाहायला मिळाले. ज्यामध्ये प्रामुख्याने जवळीक पाहायला मिळाली ती तो काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यात. संसदेत एकमेकांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या दोन पक्षाच्या या प्रमुख नेत्यांची शपथविधी मंचावरची जवळीक बरंच काही सांगून जाणारी होती. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शरद यादव, बसपाच्या अध्यक्षा मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्वच विरोधपक्षांचे नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. सोहळा पार पडल्यानंतर सर्व विरोधकांनी हात हात घेत जनतेला अभिवादन केलं. त्यामुळे 2019 ला भाजप विरुद्ध सर्व विरोधक असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement