स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळेंचा स्टुडिओ आगीत भस्मसात

Continues below advertisement
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाल्यानं कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली. त्यात संपूर्ण कार्यालय भक्ष्यस्थानी पडलं आहे. आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षीसं, विविध पुरस्कार जळून खाक झाले आहेत. त्याचबरोबर कांबळे यांचं शिल्प आणि पुस्तकांचं संग्रहालयही आगीत पूर्ण जळालं आहे.

संग्रहालयात असलेलं फायबर आणि थिनर यामुळे ही आग भडकली. कांबळे यांच्या स्टुडिओच्या परिसरात असलेला कचरा पेटवल्यानं ही आग भडकल्याचं सांगितलं जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram