स्पेशल रिपोर्ट : अनुसूचित जातीच्या लोकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य,आयपीएस भाग्यक्षी नवटकेंची बदली
नुसूचित जातींच्या लोकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांची अखेर औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. कथित व्हायरल क्लिपमध्ये "अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांनी केले आहे.