स्पेशल रिपोर्ट : शेतकऱ्यांवर रस्त्यावर दूध ओतण्याची वेळ का आली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दूध.. गावपाड्यावर हे चलनी नाणं आहे. कारण दूधामुळे हातात खेळता पैसा राहतो. तेलामिठाचा खर्च भागतो. मुलांच्या शिक्षणाची सोय होते. त्यामुळे दुधाच्या जोडधंद्यामुळे अनेकांचं भविष्य घडलं. घरातील गाई-म्हशींना लक्ष्मी म्हणून संबोधण्याचं कारण हेच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या लक्ष्मीसुद्धा शेतकऱ्यांना डोईज़ड होऊ लागल्यात. आणि त्याचं कारण आहे राजकारण.. सत्तेचं राजकारण.. आधीच गेली चार वर्ष एकाही शेतमालाला भाव नाही. तुरीला, सोयाबीनला, कापसाला जाहीर केलेला हमीभाव कागदावर राहिला, आणि आता हातात खेळता पैसा ठेवणारं दूधही परवडेना तेव्हा शेतकऱ्यानं करायचं काय? असा प्रश्न पडलाय.