GRAPHICS VIDEO | स्पेशल रिपोर्ट | 'तितली' चक्रीवादळाचं ओडिशात थैमान

Continues below advertisement
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तितली चक्रीवादळाने ओडिशात थैमान घातलं. त्यामुळं शाळा-कॉलेजसनाही सुट्टी देण्यात आलीय... तितली चक्रीवादळ सध्या ओडिशामधल्या गोपालपूर भागात पोहोचलंय... त्यामुळे तिथल्या जवळपास 3 लाख नागरिकांना दुसऱ्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. आंध्रप्रदेशातही 140 ते 150 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तिकडे गोव्यात लुबान वादळाचा तडाखा बसलाय. दुपारच्या सुमारास समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानं दक्षिण आणि उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे पाण्याखाली गेलेत. पर्यटक आणि मच्छीमारांनी या खवळलेल्या समुद्रात उतरु नये असं आवाहन प्रशासनानं केलं असून, ठिकठिकाणी धोक्याचे लाल झेंडे लावण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram