स्पेशल रिपोर्ट : वाशिम : गारिपीटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

Continues below advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसलाय. मराठवाड्यातील जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. शेताशिवार तसेच रस्त्यांवर गारांचा खच पडलेला दिसत होता. जालन्यातल्या काही रस्त्यांवरुन जाताना तर आपण काश्मिरात आहोत की काय, असाही अनुभव येत होता. लिंबाएवढ्या आकाराच्या या गारांमुळे शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झालंय. हरभरा, ज्वारी, गहू आणि द्राक्ष बागा अक्षरश भुईसपाट झाल्या आहेत. यंदा दमदार रब्बी पिकांनी परिसरातील शिवार बहरला असताना अचानक झालेल्या गारपीटीमुळे होत्याचं नव्हतं झालंय. हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा मातीत मिसळल्याने बळीराजा धास्तावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram