स्पेशल रिपोर्ट : लातूर : उदगीरमध्ये दलित-सवर्ण वादातून 24 कुटुंबांनी गाव सोडलं!
Continues below advertisement
एका घटनेतून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या रुद्रवाडी या छोट्याशा गावात मोठा वाद निर्माण झाला. यामुळे गावातील 24 कुटुंबांना गाव सोडावं लागलं. या घटनेला वैयक्तिक, जातीय , राजकीय असे सर्वच पैलू आहेत. मात्र, यातून निर्माण झालेला सामाजिक प्रश्न आता गंभीर झाला आहे.
घटनेच्या निषेधार्थ लातूर बंद ठेवण्याचा आज प्रयत्न करण्यात आला. प्रकरण वाढले असे लक्षात आल्यावर प्रशासनाने या सर्व 24 कुटुंबाची व्यवस्था सरकारी गायरानावरील एका पडक्या वसतीगृहात केली. या कुटुंबांना गावाकडे जाण्याची इच्छा राहिली नाही. विशेष म्हणजे विस्थापित झालेल्यांमध्ये गावच्या सरपंच बाई सुद्धा आहेत. गावकऱ्यांमध्ये हा केवळ दोन कुटुंबातला वाद होता, ज्याला जातीय रंग दिला जातोय.