स्पेशल रिपोर्ट 13/07/2018
Continues below advertisement
राजकारणात वारसा खूप मोठा असतो.
म्हणजे आपल्याकडे उदाहरण घ्यायचं तर राहुल आणि सोनियांना नेहरु आणि इंदिरा गांधींचा वारसा आहे. शरद पवार यशवंतरावांचा वारसा सांगतात. मग वसंतदादा पाटलांचा, विलासराव देशमुखांचा, गोपीनाथ मुंडेंचा, नारायण राणेंचा वारसा सांगत राजकारणात आलेली पहिली दुसरी पिढीही आपण पाहतो. तसा शिवसेनेत बाळासाहेबांना ऱॅशनलिस्ट असलेल्या प्रबोधनकारांचा वारसा आहे. मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे.. आता शिवसेना आणि मनसेतलं वॉर तर सर्वश्रुत आहे. त्यात नव्या ठाकरेची भर पडणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रानं याआधी गणपतीनं दूध पिल्याची अख्यायिका गाजली होती. त्यात काही तथ्य नसल्याचं कालांतरानं लक्षात आलं. पण अशा घटना आपल्या सभोवतालावर खूप परिणाम करुन जातात. खरं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात धूसर अंतर आहे. ते अंतर कधीकधी भावनेच्या भरात पार झालं तर काय होतं, हे शिर्डीत समोर आलंय.
त्यामुळे भावना विशुद्ध असावी.
आपल्याकडे साफ भावनेचा किती अभाव आहे, हे तेजश्री वैद्यकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. मास मीडियाचं शिक्षण घेतलेली ही मुलगी एप्रिल महिन्यात रेल्वेतून पडली. तिला जबर मार लागला. रेल्वेनं तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं मान्य केलं होतं, मात्र आता तिची आणि कुटुंबाची कशी दैना झालीय हे आपण पाहणार आहोत.
आणि सगळ्यात शेवटी पाकिस्तान.. दहशतवादी कारवाया, कटकारस्थान, अन्याय अत्याचारांसाठी कायम चर्चेत असतो. आणि इथले राजे कधी रंक होतील, हे सांगता येत नाही. अशीच वेळ माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर आलीय..
हे प्रकरण आपण सविस्तर पाहणार आहोत, पण सुरुवातीला बातमी नव्या ठाकरेंची..
गेल्या वर्षी अमित ठाकरे चर्चेत होते, ते त्यांच्या आजारामुळे. त्यानंतर ते एकदम फीट अवतारात आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यांची एंगेजमेंटही चर्चेचा विषय ठरली.
पण आता ते आणखी नव्या रुपात आपल्यासमोर येण्यासाठी तयार झालेत. काऱण मनसेच्या कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्याची मागणी केलीय.