स्पेशल रिपोर्ट @830 | मुलींबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार राम कदम आहेत तरी कोण?
दोन दिवसांपासून केवळ खेद आणि दिलगिरी व्यक्त करण्याचा अडेलतट्टूपणा करणाऱ्या राम कदमांनी आज ट्विटरवर माफी मागितली. ते कॅमेऱ्यापुढे आले नाहीत. पण त्यांच्या या बळजबरीच्या माफीनं वातावरण शांत होत नाहीए. कारण जोवर त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोवर शांत बसणार नाही, असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं स्पष्ट केलंय.