स्पेशल रिपोर्ट : अमित राज ठाकरे लवकरच सक्रीय राजकारणात?
Continues below advertisement
राजकारणात वारसा खूप मोठा असतो. म्हणजे आपल्याकडे उदाहरण घ्यायचं तर राहुल आणि सोनियांना नेहरु आणि इंदिरा गांधींचा वारसा आहे. शरद पवार यशवंतरावांचा वारसा सांगतात. मग वसंतदादा पाटलांचा, विलासराव देशमुखांचा, गोपीनाथ मुंडेंचा, नारायण राणेंचा वारसा सांगत राजकारणात आलेली पहिली दुसरी पिढीही आपण पाहतो. तसा शिवसेनेत बाळासाहेबांना ऱॅशनलिस्ट असलेल्या प्रबोधनकारांचा वारसा आहे. मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे.. आता शिवसेना आणि मनसेतलं वॉर तर सर्वश्रुत आहे. त्यात अमित ठाकरेंच्या रुपात नव्या ठाकरेंची भर पडणार आहे.
Continues below advertisement