स्पेशल रिपोर्ट : पुणे : सरकारकडून 'चाचा चौधरी आणि मोदी' पुस्तकांची छपाई
Continues below advertisement
केंद्र सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करतंय . परंतु हा ही खर्च सरकारला कमी वाटत असावा . कारण केंद्र सरकारने आता चाचा चौधरी आणि मोदी या नावाने कॉमीक बुक तयार करून ती अवांतर वाचनाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतलाय . या कॉमीक बुक्समधील गोष्टींमध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घुसडण्यात आलीय तर मोदींना चाचा चौधरींसारखं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Continues below advertisement