स्पेशल रिपोर्ट : पुणे : उंची वाढवण्यासाठी चक्क जॅक लावून उचलला बंगला!
Continues below advertisement
'पुणे तिथे काय उणे' याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पंक्चर झाल्यावर गाडीला जॅक लावून दुरुस्ती करणं हे खूप साहजिक आहे. मात्र पुण्यात दुरुस्तीसाठी जॅक लावून चक्क बंगलाच उचलण्यात आला. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी हे जॅक लावण्यात आले आहेत. 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून उचलण्यात आलं. पुण्यातील बी. टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनीतील 'भारद्वाज' नावाचा बंगला आहे. घरासमोर वर्षानुवर्ष रस्त्याची दुरुस्ती होत राहिली, त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. पण बंगल्याची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात घुसत होते. दरवर्षीच्या त्रासाला मालक वैतागले होते. त्यामुळे त्यांना बंगल्याची उंची वाढवून रस्त्याच्या लेव्हलला आणायची होती. या समस्येपासून सुटकेसाठी ते पर्याय शोधत होते.
Continues below advertisement