स्पेशल रिपोर्ट : पासपोर्ट हवा असेल तर धर्म बदला, लखनौमधील अधिकाऱ्याचा सल्ला!

Continues below advertisement
पासपोर्ट हवा असेल तर तुमचा धर्म बदला, असं धक्कादायक सल्ला पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्याने एका व्यक्तीला दिला. उत्तर प्रदेशातील लखनौच्या पासपोर्ट कार्यालयात एका हिंदू-मुस्लीम दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला.

परदेशात जाण्यासाठी तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी या दाम्पत्याने पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांना मुलाखतीसाठीही बोलावलं. मुलाखतीदरम्यान लखनौ पासपोर्ट कार्यलयाचा अधीक्षक विकास मिश्र, तन्वी सेठ यांना म्हणाला की, तुमच्या प्रकरणात अडचणी आहेत. तुम्ही मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं आहे तर तुमचं नाव तन्वी सेठ कसं काय असू शकतं? नाव बदलणं हे तुमचं कर्तव्य आहे.

तर अनसचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रने अनसला धर्म बदलण्यासाठी सांगितलं. हिंदू धर्म स्वीकारुन पत्नीसोबत सात फेरे घ्या, असं कर्मचाऱ्याने अनसला सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram