स्पेशल रिपोर्ट : निवडणूक बंद, आता सर्वसहमतीने साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणार
खरंतर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सन्माननीय लेखकांना मिळायला हवं. ज्यांची लेखणी सिद्धहस्त आहे. ज्यांचा साहित्य विश्वात दबदबा आहे. पण आमदार-खासदारांप्रमाणं अध्यक्षही निवडून येऊ लागले आणि प्रतिभावान लेखक या प्रक्रियेपासून फटकून राहू लागले. अगदी विंदा, मंगेश पाडगावकर, तेंडुलकर, नेमाडेंनाही अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली नाही. पण आता निवडणूक प्रक्रिया बाद ठरवण्यात आलीय. आणि आता एकमतानं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.