Rising carrom player Janhavi More | भरधाव रहदारीने घेतला राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचा बळी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्राची उदयोन्मुख राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी डोंबिवलीत अपघाती निधन झालं. जान्हवीनं २०१५ साली ज्युनियर राज्य विजेतेपद पटकावून आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली होती. कॅरम खेळात करीअर घडवण्याच्या दिशेनं तिचा प्रवास सुरू होता. पण डोंबिवलीतल्या पलावा सर्कलच्या भरधाव रहदारीनं जान्हवी मोरेचा बळी घेतला. डोंबिवलीतल्या या पलावा सर्कलच्या भरधाव रहदारीविरोधात स्थानिक नागरिकांनी सातत्यानं आवाज उठवला आहे. पण त्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही. जान्हवी मोरेसारख्या उदयोन्मुख कॅरमपटूंच्या दुर्दैवी निधनानं त्या प्रश्नाचं गांभीर्य पुन्हा समोर आलं. पाहूयात आमचा प्रतिनिधी निनाद करमरकरचा रिपोर्ट.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram