
VIDEO | नाशिकमध्ये तब्बल 9 हजार रुपये किलो 'गोल्डन मिठाई'ची चर्चा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
सणांच्या मोसमाला सुरुवात झालीए.. आज नारळी पौर्णिमेचा उत्साह आहे तर उद्या रक्षाबंधन.. याच दिवसाचं औचित्य साधत नाशिकमध्ये चक्क सोन्याची मिठाई तयार करण्यात आलीये.ही गोल्डन मिठाई विकत घेण्यासाठी खिसा बराच रिकामा करावा लागणार आहे. सुक्यामेव्य़ापासून बनलेली ही मिठाई ९ हजार रुपये किलोने विकली जातेय. गोल्डन राखी, गोल्डन बिस्कीट, गोल्डन सॅन्डविच आणि गोल्डन बदामकतली असे चार गोल्डन मिठाईचे प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
Continues below advertisement