Bhiwandi ST Bus depot | भिवंडीच्या एसटी डेपोला अवकळा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात आजही एसटी हे प्रवासाचं प्रमुख साधन आहे. त्यामुळं भिवंडीतल्या एसटी डेपोत दररोज हजारो प्रवासी येजा करत असतात. पण त्या तुलनेत प्रशासनानं एसटी डेपोच्या इमारतीकडे लक्ष दिलेलं नाही. भिवंडीच्या एसटी बस डेपोची इमारत धोकादायक बनली असून, ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं भिवंडी बस डेपोत येणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी अनिल वर्माचा रिपोर्ट.