स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीत आता छगन भुजबळ विरुद्ध धनंजय मुंडे?
आता महात्मा फुल्यांच्या पगडीला राष्ट्रवादीत अच्छे दिन येणार आहेत, तसेच ते भुजबळांनाही येणार असं दिसतंय. कारण समता परिषदेमुळे भुजबळांना देशभरातील ओबीसी समाजात मानाचं स्थान आहे.
पण गेली 2 वर्ष ईडीच्या फेऱ्यात असल्यानं ते राजकीय आखाड्यापासून दूर होते. त्यांची जागा धनंजय मुंडेंनी चालवली. पण भुजबळ परत आले, आणि त्यांनी बचेंगे औऱ लढेंगे भी अशी घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा मुंडेंच्या वाट्याला गेलेलं मानाचं पान भुजबळांना परत मिळालंय, कारण पोस्टर्सवर जिथं धनंजय मुंडे होते, तिथं आता भुजबळ दिसू लागलेत.