स्पेशल रिपोर्ट : नागपूर : तक्रारदार भाऊ-बहिणीला पोलिसांची अमानुष मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुन्हेगारांवर जरब बसवून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात आजवर नागपूर पोलीस कितपत यशस्वी ठरले, हा संशोधनाचा विषय ठरु शकतो. तरीही सर्वसामान्यांवर दमदाटी करण्यात नागपूर पोलीस सर्व मर्यादा ओलांडत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेतली जात नाही या नैराश्यातून पोलिसांच्या वर्तवणुकीचे व्हिडीओ बनवणाऱ्या एका तरुणीला तिच्या भावासह शांतीनगर पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करण्यात आली. दोघांच्या शरीरावर मारहाणीची भयंकर जखम असताना दोघे पोलीस स्टेशनच्या पायऱ्यातून खाली पडल्याचा अजब दावा पोलिसांनी पुढे केला. दोन्ही पीडित भाऊ-बहिणीने महिला आयोगासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायासाठी दाद मागितली आहे.