स्पेशल रिपोर्ट : नागपूर : विद्या कांबळे बनल्या पहिल्या किन्नर न्यायाधीश
किन्नर सामाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सारथी संघटना करते आहे. संघटनेच्या प्रयत्नांना आता मोठं यश मिळालं आहे. संघटनेच्या सदस्या विद्या कांबळेंची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ज्यांनी फक्त किन्नर असल्यामुळं वयाच्या 17 व्या वर्षी घरं सोडलं. त्यांनी किन्नर समाजासमोर आदर्श उभा केला. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांची किन्नर सामाजासाठीच्या लोक न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. विद्यांचं यश जरी दिसतं असलं तरी त्यांचा प्रवास खुप खडतर होता.