स्पेशल रिपोर्ट : अकोला : गडकरींचा एक निर्णय आणि कमळगंगेला जीवदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पृथ्वीतलावरचा सर्वशक्तीमान प्राणी कोण? तर माणूस.. त्यातल्या त्यात ज्याच्या हातात सत्ता आहे तो माणूस. सत्ता दोन्ही बाजूंनी वापरता येते. म्हणजे विधायक कामांसाठी आणि विध्वंसक कामासाठी.. एक निर्णय हजारो नव्हे लाखो लोकांचं जगणं समृद्ध करु शकतो. एक निर्णय शेकडो वर्षाचे प्रश्न निकाली काढू शकतो. एक निर्णय़ भविष्यासाठी मार्गदर्शन ठरु शकतो. पण हे निर्णय घेण्याची इच्छाशक्ती पाहिजे. त्या इच्छाशक्तीचं दर्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वेळोवेळी घडवतात.. पण अकोल्यात त्यांनी एका निर्णयात सरकारचे 16 कोटी वाचवले आणि शेकडो कोटी पाणी साचेल अशी कमळगंगा पुनरुज्जिवित केली.. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट...